karma
वेडाच्या भरात एका मोठ्या उद्योगपतीचा मुलाने आत्महत्या केली, असे माझे सहकारी वर्तमानपत्र वाचत होते. मी ही वर्तमानपत्र डोकावून पाहिलं तर त्या मुलाचा फोटो दिसला, दिसायला स्मार्ट , बारीक केस ,डोळ्यावर चौकोनी चष्मा, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होता असं वाटत होतं की अभ्यासाचा दडपणामुळे आत्महत्या केली . आज दिवसभर तीच बातमी आणि तेच विचार डोक्यात घुमतात कारण सकाळी सकाळी गोष्ट घडते किंवा एखादी बातमी कानावर पडली की आपण देवास भर आपण तेचाच विचार करत राहतो. काम खूप असल्याने वेळेचं भानच राहीले नव्हते आणि तेमध्ये पाऊस. दिवसभराच्या कामामुळे खूपच थकवा जाणवत होता. कंपनी मधून बाहेर पडलो तसा बाहेरचा भीषण कालोक त्यात मुसळधार पाऊस . ऑफिस पासून माझे घर 25 किलोमीटर असेल. त्यात नवीन जॉब असल्यामुळे कोणतेही कारण न सांगता उशिरापर्यंत काम करावे लागत होते. आमच्या कंपनीचा वयस्कर वॉचमन आता कंपनी बंद करून त्याला केलेल्या छोट्याशा खोलीमध्ये अंगावर चादर घेवून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बगत होता. मी पाऊस उघडायची वाट पाहत होतो असं वाटत नव्हतं पाऊस थांबेल. घरी जायला उशीर होत होता त्...