karma

वेडाच्या भरात एका मोठ्या  उद्योगपतीचा मुलाने आत्महत्या केली, असे माझे सहकारी  वर्तमानपत्र वाचत होते. मी ही वर्तमानपत्र डोकावून पाहिलं तर त्या मुलाचा फोटो दिसला, दिसायला स्मार्ट , बारीक केस ,डोळ्यावर चौकोनी चष्मा, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होता असं वाटत होतं की अभ्यासाचा दडपणामुळे आत्महत्या केली . आज दिवसभर तीच बातमी आणि तेच विचार डोक्यात घुमतात कारण सकाळी सकाळी गोष्ट घडते किंवा एखादी बातमी कानावर पडली की आपण देवास भर आपण तेचाच विचार करत राहतो. काम खूप असल्याने वेळेचं भानच राहीले नव्हते आणि तेमध्ये पाऊस.  दिवसभराच्या कामामुळे खूपच थकवा जाणवत होता.  कंपनी मधून बाहेर पडलो तसा बाहेरचा भीषण कालोक  त्यात मुसळधार पाऊस . ऑफिस पासून माझे घर 25 किलोमीटर असेल. त्यात नवीन जॉब असल्यामुळे  कोणतेही कारण न सांगता उशिरापर्यंत काम करावे लागत होते. आमच्या कंपनीचा वयस्कर वॉचमन आता कंपनी बंद करून त्याला केलेल्या छोट्याशा खोलीमध्ये अंगावर चादर घेवून बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बगत होता. मी  पाऊस उघडायची वाट पाहत होतो असं वाटत नव्हतं पाऊस थांबेल. घरी जायला उशीर होत होता त्यामुळे मी निघायचं ठरवलं. टेबल वर ठेवलेला वर्तमानपत्रातील त्या बातमीवर नजर गेली आणि पुन्हा एकदा त्याच विचारात मन  गुरफटलेले . पावसाळी जॅकेट घातले होते ,  झाडाखाली लावलेली बाई काडून बाहेर पडलो.  रस्ता चांगला होता पण एवढा रात्री जॉब वरून कधी आलो नव्हतो त्यामुळे मन थोडे अस्वस्थ होते. साडेबारा वाजून गेले होते पाऊसाचा जोर  चांगला होता आणि मुसळधार पाऊस .  काही मिनिटांतच मी पूर्णपणे भिजलो,  या ओसाड रस्त्यावरून जाताना  माझ्या गाडीचा ही वेग सामान्य होता.   अचानक लक्षात आलं गाडी च पेट्रोल संपत आहे तेव्हाच गाडी झटके देत काही अंतरावर  बंद पडली. बाजूला गाडी घेऊन किक मारायला सुरुवात केली पण काही केल्या गाडी सुरू होत नव्हती.


भयाण  काळोख , पडत असलेला पाऊस आणि  निर्जन ठिकाणी बंद पडलेली माझी बाईक एकूणच सर्व परिस्थितीची न राहूनही भीती वाटू लागली . अचानक समोर लक्ष्य गेलं.  तसं काळजात धक झाला  लक्षात आलं की काही अंतरावर कोणीतरी उभ आहे.  दूर वरून येणाऱ्या  कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात दिसले . ३०-३५ वयाची बाई रस्त्याच्या कडेला उभी होती. आकाशी रंगाची साडी  आणि काळा रंगाची लेडीज पर्स तीचा खंड्या वर  होती, एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात २-३  पिशवी होत्या . दूरवरून येणारे एका कार त्यांनी थांबवण्यासाठी हात पुढे केला पण  गाडी सुसाट वेगात अशीच निघून गेली आणि पुन्हा एकदा काळाकुट्ट अंधार पसरला . मानत विचार केला बाईक  सुरू झाली की त्या बाईला घरी सोडूनच घरी जायचं. तेव्हा मी परत बाईक सुरू  करण्याचा प्रयत्न करू लागलो अचानक मागून 2 कार येत होत्या. कॉलेज चे मुलं होते ते ,  एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या. सुसाट वेगाने ती कार माझा जवळून गेली मी काही बोलणार तेवढ्यात मोठा आवज झाला . समोर पहिलं तर  त्या बाईंना जोरदार धडक बसली आणि त्यापुढे पडल्या . मी मागून जोरात ओडलो पण त्यांनी कार जोरात नेली. पुढच्या चाकत अडकून बाई १०-१५ मीटर फरपट गेल्या.   त्या भयाण शांतता मध्ये रस्त्यावर पडलेल्या स्त्रीचा वेदनेचा  आवाज घुमू लागला .  त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना तसेच दोन्ही हातानी उचलून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून मी घातलेले जाकीट घालून तेना थोडा धीर देयाचा पर्यंत करू लागलो. तेन च्या जखामातील रक्ताने माझे कपडे लाल झाले होते. 


अंबुलान्सला कॉल करण्यासाठी खिशातून मोबाईल काढला आणि लक्षात आली की पावसाच्या पाण्याने भिजुन तो कधीही स्विच ऑफ झाला होता. त्यां बाईने माझा हात गच्च पकडुन अडखळत बोलू लागल्या प्लीज मला वाचवा दिवाळीच्या सणासाठी माझ्या मुलांसाठी कपडे आणि खाऊ आणला होता. दारू नशा मुळे माझा नवरा गेला आता मला काही बरा वाईट झालं तर माझे मुलं पोरकी होतील हो.  आपल्या मुलांसाठी काळजी स्पष्ट दिसत होती. रस्त्यावर पडलेले  त्यांचे साहित्य जमा करून  त्यांच्या जवळ आणून दिलं आणि मदत मिळते का ते पाहू लागलो . पण दूर दूर पर्यंत कोणतेही वाहन दिसत नव्हते . माझ्या बाईक जवळ जाऊन  पुन्हा सुरू करण्याची केविलवाणी धडपड करु लागलो पण व्यर्थ . पुन्हा  त्यांच्याजवळ जात त्यांची पर्स मध्ये बगत होतो . तशा त्या बाई माझ्या समोर हात जोडून बोलू लागल्या छोट्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी आणलेले पैसे आहेत ते. प्लीज ते  पैसे घेऊ नका.  मी काहीच न बोलता त्यांच्या पर्स मध्ये साहित्य शोधू लागलो आणि माझ्या कामाची वस्तू मला मिळाली. इमर्जन्सी कॉल करून अंबुलान्स बोलावली आणि घटनेची माहिती दिली आणि पुन्हा मोबाईल त्यांच्या पर्स मध्ये ठेवला. थोडावेळत अंबुलान्स येईल असे सांगितल्यावर त्यांना थोडं बरं वाटलं. पण तरी खूप रक्त गेल्याने त्या बेशुद्ध होत चाल्याहोत्या . माझ्याकडे पाहत बोल्या इथून ५-६ किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला माझे  घर आहे. हा  माझ्या मुलांचा फोटो आणि माझ्या मुलांसाठी घेतलेले कपडे आणि खाऊ आहे त्यांना आठवणीने द्या आणि सांगा तुमची आई लवकर परत येईल. तेवढ्यात अंबुलान्सचा आवजा आला .हॉस्पिटलचे कर्मचारी स्त्रेचर घेऊन खाली उतरले आणि तेणा घेऊन मी त्या जखमी बाई जवळ आलो आणि धकाच बसला. आजूबाजूला असलेले कर्मचारी मला विचारू लागले पण माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्या झाडाखाली बाई नव्हती पण तिच्या अंगावर घातले जॅकेट तेथेच पडले होते . आम्ही तिघांनी मिळून त्यांना खूप शोधलं पण त्या कुठे दिसत नव्हत्या . १५ -२० मिनिटांनी ते अंबुलान्स चे कर्मचारी मला वेडा समजून  निघून गेले. मला  काय चाललंय काही समजत नव्हतं ज्या बाईला बोलताही येत नव्हतं त्या अचानक कुठे गेल्या असतील थोडा वेळा नंतर मी ही  परंतु लागलो.

माझ्या बाईकच्या दिशेने चालू लागलो तसे माझ्या लक्षात आलं की त्या महिलेच्या पांढरी पिशव्या माझ्या बाईक चां हँडेला अडकवल्या होत्या बाईक वर बसून किक मारायली तर लगचे स्टार्ट पण झाली. थोडा आश्चर्य वाटलं. त्यांनी दिलेल्या पिशव्या त्यांच्या घरी देयाला निघालो. पण त्यांचं घर ओळखायचं कसं पाऊस चालूच होता . रात्री चे २ वाजून गेलेले . त्यामुळे एवढा रात्री कोनाला विचारायचं असा विचार करत होतो तर अचानक दिसलं  कोणती रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभा आहे आणि गाडी थांबुन पाहिलं तर  एका झाडाखाली दहा-बारा वर्षांची मुलगी आणि सात ते वर्षांचा छोटा मुलगा उभे होते  . त्यांच्याजवळ जाऊन पहिलं तर ते दोघे हि चिंब भिजले होते आणि थंडीने कापत एकमेकांना आधार देत होते. मी त्यांच्या जवळ जाऊन तुमचं घर  कुठे आहे आणि एवढ्या रात्रीचा काय करतात विचारू लागलो पण दोघेही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपल्याला लहान भावाला  घट्ट मिठी मारून ती मुलगी फक्त माझ्याकडे पाहत होती आणि चटकन लक्षात आलं की काही वेळापूर्वी त्या बाईंनी आपल्या लॉकेटमध्ये ज्या मुलांचे फोटो दाखवले होते ती हीच त्यांना पाहताच वाईट वाटले. त्यांच्या आईने दिलेल्या कपड्यांच्या आणि खाऊन च्या पिशव्या त्यांच्या हाती देत मी पुन्हा विचारलं, तशी त्या मुलीने आपली मान मागे वळवून बघू लागली, मी ही  त्या दिशेला पाहू लागलो पण अंधार असल्याने मी काही दिसत नव्हते. त्यांना तिथेच थांबून, मी चालत पुढे निघालो. आता समोर चित्र हळूहळू दिसत होत.  काही अंतरावरच एक गाडी उभी होती थोडं विचित्र वाटलं ते रस्ता सोडुन गाडी खाली काय करते. कुतुहलापोटी मी पुढे जाऊन पाहिलं तर एका घरात घुसली होती . समोरच्या भिंतीवर त्या बल्बचा प्रकाशात घरातील सर्व विखुरलेल्या वस्तू दिसत होत्या . झटकन लक्षात आलं की मगाशी हिच गाडी बाईला जोराची धडक देऊन गेली होती. गाडीच्या काचा फुटल्या होत्या पण गाडीत कोणीच दिसत नव्हतं गाडीच्या जवळ गेलो तसा आत एक कॉलेजचे आयकार्ड दिसले. एक हात पुढे  घेत आयकार्ड घेतलं आणि त्यात माझी नजर गाडीचा चाका कडे गेली. तसा काळजाचा ठोका चुकला, हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून सर्वांग शहारलं सरकन काटा येऊन गेला माझ्या पायाखाली रक्ताचा सडा पडला होता. त्या घरात झोपलेल्या दोघा बहिण भावाला त्या गाडी ने झोपेतच चिरडले होते. झटकन मी तेथून बाजूला झालो.बाहेरच्या काळोखात कुणीतरी माझ्या दिशेनं येत असल्याचं जाणवलं.  मी समोर पाहु लागलो ते बहिण-भाऊ समोर उभे होते. तसा  अंगावर काटा आला  . कारण त्या गाडीच्या चाकाखाली त्या दोघांची प्रित होती असं वाटत होतं हे सगळं स्वप्नवत आहे कधी त्या दोघांची प्रेते पहात होतो तर कधी समोर उभा त्या दोघांना असं वाटत होतं की आता इथेच बेशुद्ध होईल, तोच आणखी धक्का बसला आता मात्र भीतीने छाती फाडून बाहेर येईल असे वाटू लागले, डोळे मोठे करून मी समोर पाहत होतो त्या मुलांच्या मागून अंधारातून एक आकृती पुढे येऊ लागली आणि  लक्षात आला होता की ही तीच बाई जिचा अपघात झाला होता .ती काहीच बोलत नव्हती. तिघेही एक टक माझ्याकडे पाहत होते. तोच त्या बाईने माझ्या हातातील आयकार्ड कडे बोट दाखवले तसे माझी नजर त्या आयकार्ड वर गेली आणि सुन्न झालो. त्यावरचा फोटो पाहतच डोक्यात लाल मुंग्यांचे वारूळ उठला होतं आणि आज सकाळचा प्रसंग आठवला वेड्यांचा भरात एका मोठ्या उद्योगपतीचा मुलाने बिल्डिंग वरून उडी घेऊन आत्महत्या केली. माझ्या बाजूच्या टेबलवर बसले माझे सहकारी मोठ्याने वर्तमानपत्र वाचत होते . त्या कार्ड वर आत्महत्या केलेल्या त्याच मुलाचा फोटो होता. तो फोटो पाहताच त्या बाईकडे आणि तिच्या मुलांकडे पाहिलं तशी ती आपल्या मुलांना जवळ घेत एकदम नाहीशी झाली. तसा मी जागेवरच बेशुद्ध झालो होतो. जेव्हा सकाळ झाली  तेव्हा एक माणूस उभा होता, डोळे  उघडून निट पाहिलं तर मी एका पडक्या घरात होतो पडझड झालेल्या भिंती , अर्धवट तुटलेल छत,  उगवलेले खुरटे गवत बागुन ताडकन उठून उभा राहिलो. मी काही बोलणार तेवढ्यात ती व्यक्ती बोलू लागली तुलाच नाही तर खूप लोकांना अनुभव आला. एक वर्ष होऊन गेले या घटनेला हसत खेळत घर उद्ध्वस्त करून टाकला. दारूच्या नशेत एक गाडी या घरात घुसली . दोन्हीमुले जागेवरच मेली होती त्यांच्या आई घरी आली तर कसं सांगायचं आम्हा सर्वांना प्रश्न पडलेला पण सकाळी समजलं ते रात्री त्यांच्या आईचा अपघात झाला आणि सकाळपर्यंत तिची ओळख पटत नव्हती अशी अवस्था झाली होती बड्या बापाची अवलाद त्यामुळे पैसा देऊन केस मिटली पण आपली कर्म आपली पाठ सोडत नाहीत . काहीच न बोलता मी तिथून बाहेर पडलो बाईक रस्त्याच्या कडेला तशीच उभी होती. पाऊस थांबला होता आणि आकाशही स्वच्छ दिसत होतं . बाईक वर बसत त्या घराकडे पाहिलं खूप वाईट वाटत होतं दारूच्या नशेने आणि पैशाच्या मस्तीने एक हसतखेळत घर उध्वस्त झाल होता , पण शेवटी आपले कर्म आपली पाठ कधीच सोडत नाही, कधी ना कधी आपल्या वाईट कर्माची शिक्षा आपल्याला मिळतच फरक एवढाच आहे की ती कोणत्या रूपात मिळेल हे सांगता येत नाही  .......


English translation:

My colleagues were reading the newspaper that the son of a big businessman had committed suicide in a fit of madness.  I peeked through the newspaper and saw a photo of the boy, smart looking, with thin hair, square glasses over his eyes, in his last year of engineering, thinking he had committed suicide due to the pressure of studying.  Today, the same news and the same thoughts go through our heads all day long because something happens in the morning or when we hear a news that we are thinking the same thing in mind . There was a lot of work and there was no sense of time and it rained.  I was feeling very tired from the day's work.  It rained heavily outside as we walked out of the company.  My house will be 25 kilometers from the office.  Since he had a new job, he had to work late without giving any reason.  The elderly Watchman of our company was now closing the company and looking at the rain coming out of the small room he had made with a sheet over his body.  I was waiting for the rain to stop , I didn't think the rain would stop.  It was getting late, so I decided to leave.  I looked at the news in the newspaper on the table and once again my mind was engrossed in the same thought.  Wearing a rain jacket, the bike under the tree came out.  The road was good but I had never been to work so late at night so I was a little upset.  It was half past twelve, the intensity of the rain was good and the torrential rain.  Within minutes I was completely soaked, the speed of my bike was normal on this deserted road.  Suddenly it was noticed that the car was running out of petrol and the bike stopped at a distance.  He took the bike to the side and started kicking but the bike did not start.  The scary darkness, the falling rain, and the fact that my bike was parked in a secluded place made me feel scared, despite all the circumstances.  Suddenly  I was shocked and noticed that someone was standing at a distance.  Seen in the light of the headlights of a car coming from a far.  A 30-35 year old woman was standing on the side of the road.  She was wearing a sky blue sari and a black ladies purse with an umbrella in one hand and 2-3 bags in the other.  He reached out to stop a car coming from a distance, but the car speed away and once again darkness fell.  Assuming the bike started, the woman would leave to the house and I will go to home.  Then I started trying to start the bike again. Suddenly 2 cars were coming from behind.  They were college kids, trying to overtake each other and move on.  As the one car speed past me, I heard a loud bang.  At first glance, the woman was hit hard and fell to the ground.  I slammed into the back but they speed off. Women Stuck in the front wheel, the woman spun 10-15 meters.  In that frightening silence the sound of the woman lying on the street began to reverberate.  I went to them and picked them up with both hands and sat under a tree by the side of the road, put on my jacket and started to give them a little patience.  My clothes were red with blood from Ten's wounds.  He pulled a mobile out of his pocket to call an ambulance and noticed that it had  been switched off after being soaked in rainwater.  The woman grabbed my hand and started talking. Please save me. I had brought clothes and food for my children for Diwali.  My husband passed away due to alcoholism. If something bad happens to me now, my children will become orphans.  Care for our children seemed obvious.  I collected their supplies lying on the road and brought them to us and began to see if we could get help.  But no vehicles were visible in the distance.  I tried to get close to my bike and start again, but it failed.  Going to them again, search in his purse.  That's how the woman joined hands in front of me and started talking about the money brought to pay the school fees of the little children.  Please don't take that money.  Without saying a word I started looking for the material in their purse and I found my work item.  He called an ambulance and reported the incident and put the mobile in his purse again.  He was relieved to hear that an ambulance would arrive shortly.  But she was losing consciousness due to excessive bleeding.  Looking at me, my house is on the side of the road, 5-6 km from here.  This is a photo of my children and the clothes and food taken for my children. Remind them and tell them your mother will be back soon.  At that moment, the sound of an ambulance came. The staff of the hospital came down with a stretcher and I came to the injured woman with a stretcher and sat down.  The staff around me started asking but words were not coming out of my mouth. There was no woman under the tree but the jacket on her body was lying there.  The three of us searched for them a lot but couldn't find them.  After 15-20 minutes, the ambulance crew left, thinking I was crazy.  I didn't understand what was going on. The woman who couldn't even speak could have gone suddenly. After a while,

As I started walking towards my bike, I noticed that the woman's white bags were stuck to the handle of my bike. If I sat on the bike and kicked, the bike started.  A little surprised.  We went to their house to pay for the bags they gave us.  But it was still raining and it's difficult to identify their home.  It's 2 o'clock at night.  So when I was thinking about asking someone , I suddenly saw him standing under a tree on the side of the road and when I saw the bike stop, I saw a ten to twelve year old girl and a seven to four year old boy standing under a tree.  When I approached them, I saw that they were soaking wet and were supporting each other, shivering from the cold.  I approached them and asked them where your house was and what they were doing all night but they were not in the mood to talk.  The girl was just staring at me, hugging her little brother tightly, and I quickly realized that it was the same girl who had shown the photos of the boy in her locket some time ago.  I asked again, handing over the clothes and food bags given to her by her mother, the girl started looking back, I started looking in that direction but I couldn't see anything as it was dark.  Stopping them there, I continued walking.  Now the picture in front was slowly appearing.  A car was parked at a distance. It seemed a little strange what the car was doing leaving the road.  Out of curiosity, I went ahead and saw that he had entered a house.  In the light of that bulb on the front wall, all the scattered objects in the house were visible.  It was immediately noticed that the same vehicle had hit the woman in the back.  The glass of the car was broken but no one was seen in the car. As I approached the car, I saw a college icard inside.  Taking one hand forward, I took the iCard and my eyes went to the wheel of the car.  I missed the heartbeat, seeing the heart-wrenching scene,  and went with a thorn in my side.  The two brother and sister who were sleeping in the house were crushed by the car in their sleep.  Suddenly I stepped aside. In the darkness outside, I felt someone coming towards me.  The siblings I was looking at were standing in front of me.  There was a thorn in the flesh.  Because it seemed like they were in love under the wheel of the car. It's all a dream. Sometimes they were looking at the corpses of the two of them. Sometimes they were standing in front of the car.  A figure came out of the darkness behind the children I was looking at with wide eyes and realized that this was the same woman who had the accident. She was not saying anything.  All three of them were staring at me for a while.  Just as the woman pointed to the iCard in my hand, my eyes went to the iCard and I became numb.  Seeing the photo on it, a swarm of red ants had risen in my head and I remembered this morning's incident. In a fit of madness, the son of a big industrialist jumped from the building and committed suicide.  Sitting at the table next to me, my colleagues were reading the newspaper aloud.  On that card was a photo of the same boy who had committed suicide.  As soon as he saw the photo, he looked at the woman and her children.  That's how I fainted on the spot.  When it was morning, a man was standing. I opened my eyes and saw that I was in a dilapidated house with fallen walls, half-broken roof, and overgrown grass.  As soon as I said something, the person started talking. Not only you, but a lot of people got the experience.  A year later,   A drunken car rammed into the house.  Both of them had died on the spot. If there mother came home. We all had a question as to how to tell, but in the morning we found out that their mother had an accident at night and she was unrecognizable till morning. Police case is closed by paying money but her deeds do not leave her behind.  Without saying a word I got out of there the bike was still standing on the side of the road.  The rain had stopped, and the sky was clear.  It was very sad to see the house sitting on the bike. A happy family house was destroyed due to drunkenness and fun of money, but in the end, your karma never leaves your lesson.  Can't tell...

Comments

Popular posts from this blog

Kokan trip - unforgettable experience

Night drive