Night drive
हि कधीही न विसरणी घटना माझा दादा सोबत घडली होती.तो पुणे मध्ये काम करायचा. दिवाळीचा सुट्ट्या लागलया होत्या तो कारने घरी येण्यासाठी रात्री निघाला. रात्री ड्राईव्ह करणं तेचा साठी काही नवीन नव्हते. पण तेला काय माहित होते तेच्या पदरी काय वाडून ठेवले होते . साधारण ५-६ तास ड्राईव्ह केला नंतर तो रात्री २ चा दरम्यान गावाचा वेशी जवळ आला. तेथे जवळच एक नदी होती. ती नदी ओलांडून आला की आमचा गाव होते . तो नदी ओलाडून जात असतानाच तेची गाडी ब्रीज वर बंद पडली. गावाकडचा परिसर असल्यामुळे सगळी कडे अंधार पसरला होता. एवढा रात्री कोणाकडून मदत मिळणे अशक्य होते. कारण त्या परिसरात कोणतेच घर नव्हते . दादानी बाहेर येऊन गाडीचे बोनेड उगडले आणि काय बिगड झाला ते बघत होता. पण सर्व काही व्यवस्थित होत. तस तो परत गाडीत जाऊन स्टार्ट करून बघत होता. पण गाडी चालू होतं नव्हती. तर तो परत बाहेर आला आणि परत बघत होता कोठे बिघाड झाला आहे. पण नक्की काय बिघाड झाला हे तिला समजत नव्हते . आता चालत घरी जावे लागणार असा विचार करत असतानाच अचानक तेला कसली तरी चाहूल लागली ते च्या मागून कोणीतरी चालत येत होते.तेने वळून तिरक्या नजरेने बघण्या...